Tuesday, December 29, 2009

मराठा समाजाचा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा
जिजाऊ ब्रिगेडच्या महिला आंदोलन करतील
सकाळ वृत्तसेवा
Thursday, December 10, 2009 AT 11:45 PM (IST)
maratha reservation,jijau brigade.

उस्मानाबाद - मराठा समाजाला आरक्षणासाठी मराठा समाजातील आमदारांनी सकारात्मक भूमिका न घेतल्यास हा मुद्दा घेऊन मराठा सेवा संघ रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार गवारे यांनी दिला आहे.

श्री. गवारे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा दुर्लक्षित करण्यात आला; परंतु मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडसाठी हा मुद्दा जिव्हाळ्याचा व सामाजिक बांधिलकीचा आहे. यामध्ये सर्वसामान्य व गरीब मराठ्यांची अस्मिता आहे. गुरुवारी (ता. दहा) नागपूर येथे मराठा समाजाला आरक्षणासाठी मराठा आमदारांची बैठक होत आहे. यामधून सकारात्मक काही बाहेर पडले नाही तर मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. मराठा आमदारांची बैठक हे संघटनेच्या प्रयत्नांचे फळ आहे. मराठा समाजावर आरक्षणासाठी अन्याय सुरूच राहिला तर संघटनेच्या सर्व 32 कक्षांमार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून संघर्ष करतील, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते शैक्षणिक संस्था बंद पाडतील, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या सर्व शिक्षकांसह सामूहिक रजा देतील, नामदेव तुकाराम वारकरी परिषद गावागावांमध्ये जागृती करेल, जिजाऊ ब्रिगेडच्या महिला आंदोलन करतील. लढवय्या मराठ्यांनी आपल्या अस्तित्वाच्या लढ्यात तन-मन-धनाने उतरावे. समाजातील नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी, महिला, उद्योजक, व्यावसायिकांनी मराठा समाजाला आरक्षणासाठी आपल्या भावना 50 ओळींमध्ये मराठा सेवा संघाच्या कार्यालयात द्याव्यात, असे आवाहन श्री. गवारे यांनी केले आहे
जिजाऊ बिगेड मंत्र्यांना शिवनेरीवर पाऊल ठेवू देणार नाही
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून छत्रपती शिवाजी महाराजांंचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडावर शिवजयंतीच्याच दिवशीच, गुरुवारी 'राडा' झाला. आरक्षणाचा निर्णय जाहीर न केल्यास मंत्र्यांना शिवनेरीवर पाय ठेवू देणार नाही, या आपल्या इशाऱ्याची अमलबजावणी करण्यासाठी मराठा कार्यर्कत्यांची मंत्र्यांच्या हेलिकॉप्टरवर दगडफेक करण्यापर्यंत मजल गेली. पोलिस आणि कार्यर्कत्यांमध्ये धुमश्चक्री होऊन त्यात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १४ पोलिस आणि १०-१२ कार्यकतेर् जखमी झाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचे जाहीर न केल्यास शिवजयंतीला मंत्र्यांना शिवनेरीवर पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण समन्वय समितीने दिला होता. त्यामुळे गडावर बुधवारपासूनच कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि जिजाऊ बिगेड या संघटनांचे कार्यकतेर् पहाटेपासूनच गडावर दाखल होत होते. काही कार्यर्कत्यांना किल्ल्याच्या पायथ्याशी रोखून धरण्यात आले. कार्यर्कत्यांनी घोषणाबाजी केल्यानंतर जिल्हाधिकारी चंदकांत दळवी यांनी शांततेचे आवाहन केले. मात्र, त्यास प्रतिसाद मिळाला नाही.

सकाळी दहाच्या सुमारास अर्थमंत्री दिलीप वळसे-पाटील, वनमंत्री बबनराव पाचपुते कार्यक्रमाच्या ठिकाणी हेलिकॉप्टरने येत असल्याचे समजल्यावर कार्यर्कत्यांनी हेलिपॅडजवळ गदीर् केली. गदीर् पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे गोंधळ उडाला. कार्यर्कत्यांनी दगडफेक सुरू केली. याचवेळी वळसे-पाटील यांना घेऊन येणारे हेलिकॉप्टर उतरले. दगडफेकीत हेलिकॉप्टरची काच फुटली.

या धुमश्चक्रीत पोलिस अधीक्षक रवींद कदम, अप्पर पोलिस अधीक्षक रवींद मोराळे, विभागीय अधिकारी श्रीकृष्ण कोकाटे आणि परदेशी, पोलिस निरीक्षक रसाळ, सावंत, फौजदार जे. पी. काळे, महिला पोलिस कर्मचारी एस. एम. मदने आणि सहा कर्मचारी असे १४ पोलिस जखमी झाले. तसेच दहा ते बारा कार्यकतेर् जखमी झाले. या प्रकारानंतर घटनास्थळी दाखल झालेले मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी कार्यर्कत्यांना शांततेचे आवाहन केले. पाचपुते यांनीही कार्यर्कत्यांशी संवाद साधला.

या प्रकरणात १५ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रात्री उशीरानंतर पोलिसांनी अटकसत्र सुरू केले आहे.
मंत्र्यांच्या बंगल्यात महिलांची धडक
Thursday, January 22nd, 2009 AT 12:01 AM
jijau brigade
मुंबई, ता. २१ - मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी "जिजाऊ ब्रिगेड'च्या महिला कार्यकर्त्या आज दुपारी मंत्रालयासमोरील सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शासकीय बंगल्यात घुसल्याने एकच खळबळ उडाली. "ब्रिगेड'च्या २१ महिलांनी बंगल्याच्या एका खोलीत आतून कडी लाऊन स्वतःला कोंडून घेतले व आत्मदहनाचा इशारा दिल्यामुळे पोलिस यंत्रणेची तारांबळ उडाली.
मंत्र्यांना बाहेरून खिडकीतून दरवाजा उघडा म्हणून त्यांना विनवणी करावी लागली. अडीच तासानंतर या महिलांनी दरवाजा उघडला. सायंकाळी या सर्व महिलांना अटक करून आझाद मैदान पोलिस ठाण्यात त्यांची रवानगी करण्यात आली.
मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या महिला शिष्टमंडळाशी चर्चा केली व मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर सरकारची सकारत्मक भूमिका असल्याचे सांगितले
जिजाऊ ब्रिगेडचा मंत्र्याच्या बंगल्यावर कब्जा
21 Jan 2009, 1618 hrs IST
मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी छावा, जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मंत्रालयासमोरील बंगल्यावर हल्लाबोल केला.आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी काही काळ हा बंगला आपल्या ताब्यात घेतला होता.

मराठ्यांच्या आरक्षणाचा राडा आता पुन्हा एकदा पेटत असून, मुंबईत या संघटनांनी आझाद मैदानावर उपोषणास सुरुवात केली आहे. या आंदोलानाचा पुढील भाग म्हणून, या संघटनांनी बुधवारी मंत्रालयासमोरील हर्षवर्धन पाटील यांच्या ए-६ या बंगल्यावर आक्रमण केले.

या हल्ल्यात काही महिला कार्यकर्त्यांनी स्वतःला बंगल्यात कोंडून घेतले. पण नंतर पोलिसांच्या कारवाईनंतर या महिलांनी आंदोलन मांगे घेतले, आणि त्या बंगल्याबाहेर आल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत.
बडवे हटाव मोहिमेसाठी पंढरपुरात जिजाऊ ब्रिगेचे धरणे आंदोलन
पंढरपूर 31 Mar, 2004, 1922 hrs IST :
एक एप्रिल रोजी होणाऱ्या चैत्री एकादशी दिवशी विदोही चळवळीने जाहीर केलेल्या धरणे आंदोलनामुळे श्री विठ्ठल मंदिरातून बडवे हटाव प्रश्ान् पुन्हा ढवळून निघणार आहे.

विदोही चळवळीचे नेते भारत पाटणकर , पार्थ पोळके यांनी गेल्या आषाढी यात्रेपासून बडवे हटाव मोहीम सुरू करण्याची घोषणा केली होती. आता या आंदोलनास संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड यांसारख्या संघटनांच्या पाठिंब्यामुळे समाजातून मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. चैत्री एकादशीच्या दिवशी श्रविठ्ठल मंदिराबाहेर सकाळी अकरा ते पाच या वेळेत विदोहीचे राज्यभरातून आलेले निवडक कार्यकतेर् धरणे आंदोलन करणार असून , त्याला संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड साथ देणार आहे.

दरम्यान , प्रशासनाने आंदोलनर्कत्यांच्या मागण्यांची नोंद घेऊन शासनाला माहिती दिली आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आंदोलनर्कत्यांनी चैत्री एकादशीचे आंदोलन रद्द करावे , अशी विनंती त्यांना केल्याचे प्रांताधिकारी जगदाळे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

चैत्री एकादशीसाठी गावात भाविकांची वर्दळ वाढली असून , उजनी धरणातून सोडलेले पाणी चंदभागेच्या पात्रात आल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र शहरातील तापमानाने42 अंश सेंटीग्रेडपर्यंत मजल मारल्याने दुपारी रस्त्यावर शुकशुकाट असतो
जिजाऊब्रिगेडचे महिला अधिवेशन PrintE-mail
चंद्रपूर, २७ नोव्हेंबर / प्रतिनिधी
मराठा सेवा संघप्रणित जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने महिलांचे पहिले अधिवेशन उद्या, २८ नोव्हेंबरला प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. महिलांचे संघटन करून त्यांच्या अस्मिता व अस्तित्वाचा संघर्ष उभा करणे, त्यातून स्त्रिला धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक, राजकीय, वैचारिक, शैक्षणिक गुलामगिरीतून मुक्त करणे, स्त्रियांमधील क्षमतांचा विकास करून राष्ट्रउभारणीसाठी त्याचा वापर करण्यासाठी अधिवेशन घेण्यात येत आहे, असे जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्ष आशा ठाकरे यांनी सांगितले.
या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सीमा ढवळे राहणार आहेत. जिल्हा प्रकल्प अधिकारी माधुरी मडावी यांच्या हस्ते सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे. डॉ. सुलभा गावंडे, दुर्गा येडे, आशा ठाकरे, शारदा देशमुख, प्रश्नचार्य डॉ. विद्या बांगडे, नगिना पुगलिया, पुष्पा बोडे, सुमित्रा म्हात्रे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनात ‘बहुजन स्त्रियांचे योगदान काल-आज-उद्या’ आणि ‘महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची दिशा व जिजाऊ ब्रिगेड’ यावर गंगाधर बनबरे व जयश्री शेळके हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी जिल्हय़ात महिलांच्या उत्थानात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांचा सामाजिक सेवा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या अधिवेशनात जिल्हय़ातील सुमारे ३ हजार महिला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम स्थळाला राणी हिराई परिसर, तर विचार मंचाला स्मृतिशेष पंढरीनाथ सोनटक्के विचारपीठ असे नाव देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष लता होरे, कार्याध्यक्ष छाया चटप, जिल्हा सचिव सुरेखा बोबडे, कोषाध्यक्ष मीनाक्षी ढुमणे, संघटक रजनी चटप, रजनी जेरूरकर, अल्का टोंगे, पुष्पा बोडे आदी उपस्थित होत्या.
'जिजाऊ ब्रिगेड'च्या कार्यकर्त्यांना अटक नाही
सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 22nd, 2009 AT 10:01 PM
jijau brigade,shivdharma,maratha

मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शासकीय बंगल्यात घुसून आंदोलन करणाऱ्या "जिजाऊ ब्रिगेड'च्या महिला कार्यकर्त्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. खुद्द सहकार मंत्र्यांनीच महिला कार्यकर्त्यांवर कारवाई करू नये, असे लेखी पत्र दिल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दिली.
मंत्रालयात काल मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना दुपारी एक-दीडच्या सुमारास "जिजाऊ ब्रिगेड'च्या 21 महिला कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोरील हर्षवर्धन पाटील यांच्या बंगल्यात घुसून दरवाजे बंद करून आंदोलन सुरू केले. पाटील यांनी त्यांची मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबरोबर चर्चा घडवून आणतो, असे आश्‍वासन दिल्यानंतर तब्बल दोन तासांनंतर दरवाजा उघडण्यात आला. पाच महिलांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सरकारची भूमिका सांगितली. तोपर्यंत इतर महिलांना अटक न करता बंगल्यातच बसवून ठेवण्यात आले होते.
या महिलांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करू नये, असे पत्र हर्षवर्धन पाटील यांनी पोलिसांना दिले. त्यामुळे अटकच काय, परंतु मंत्र्यांचीच तक्रार नसल्यामुळे साधा गुन्हाही त्यांच्याविरुद्ध नोंदविण्यात आला नाही, त्यांना सोडून देण्यात आले, अशी माहिती नांगरे पाटील यांनी दिली.