जिजाऊ बिगेड मंत्र्यांना शिवनेरीवर पाऊल ठेवू देणार नाही
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून छत्रपती शिवाजी महाराजांंचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडावर शिवजयंतीच्याच दिवशीच, गुरुवारी 'राडा' झाला. आरक्षणाचा निर्णय जाहीर न केल्यास मंत्र्यांना शिवनेरीवर पाय ठेवू देणार नाही, या आपल्या इशाऱ्याची अमलबजावणी करण्यासाठी मराठा कार्यर्कत्यांची मंत्र्यांच्या हेलिकॉप्टरवर दगडफेक करण्यापर्यंत मजल गेली. पोलिस आणि कार्यर्कत्यांमध्ये धुमश्चक्री होऊन त्यात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १४ पोलिस आणि १०-१२ कार्यकतेर् जखमी झाले.मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचे जाहीर न केल्यास शिवजयंतीला मंत्र्यांना शिवनेरीवर पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण समन्वय समितीने दिला होता. त्यामुळे गडावर बुधवारपासूनच कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि जिजाऊ बिगेड या संघटनांचे कार्यकतेर् पहाटेपासूनच गडावर दाखल होत होते. काही कार्यर्कत्यांना किल्ल्याच्या पायथ्याशी रोखून धरण्यात आले. कार्यर्कत्यांनी घोषणाबाजी केल्यानंतर जिल्हाधिकारी चंदकांत दळवी यांनी शांततेचे आवाहन केले. मात्र, त्यास प्रतिसाद मिळाला नाही.
सकाळी दहाच्या सुमारास अर्थमंत्री दिलीप वळसे-पाटील, वनमंत्री बबनराव पाचपुते कार्यक्रमाच्या ठिकाणी हेलिकॉप्टरने येत असल्याचे समजल्यावर कार्यर्कत्यांनी हेलिपॅडजवळ गदीर् केली. गदीर् पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे गोंधळ उडाला. कार्यर्कत्यांनी दगडफेक सुरू केली. याचवेळी वळसे-पाटील यांना घेऊन येणारे हेलिकॉप्टर उतरले. दगडफेकीत हेलिकॉप्टरची काच फुटली.
या धुमश्चक्रीत पोलिस अधीक्षक रवींद कदम, अप्पर पोलिस अधीक्षक रवींद मोराळे, विभागीय अधिकारी श्रीकृष्ण कोकाटे आणि परदेशी, पोलिस निरीक्षक रसाळ, सावंत, फौजदार जे. पी. काळे, महिला पोलिस कर्मचारी एस. एम. मदने आणि सहा कर्मचारी असे १४ पोलिस जखमी झाले. तसेच दहा ते बारा कार्यकतेर् जखमी झाले. या प्रकारानंतर घटनास्थळी दाखल झालेले मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी कार्यर्कत्यांना शांततेचे आवाहन केले. पाचपुते यांनीही कार्यर्कत्यांशी संवाद साधला.
या प्रकरणात १५ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रात्री उशीरानंतर पोलिसांनी अटकसत्र सुरू केले आहे.
No comments:
Post a Comment