जिजाऊब्रिगेडचे महिला अधिवेशन |
चंद्रपूर, २७ नोव्हेंबर / प्रतिनिधी मराठा सेवा संघप्रणित जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने महिलांचे पहिले अधिवेशन उद्या, २८ नोव्हेंबरला प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. महिलांचे संघटन करून त्यांच्या अस्मिता व अस्तित्वाचा संघर्ष उभा करणे, त्यातून स्त्रिला धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक, राजकीय, वैचारिक, शैक्षणिक गुलामगिरीतून मुक्त करणे, स्त्रियांमधील क्षमतांचा विकास करून राष्ट्रउभारणीसाठी त्याचा वापर करण्यासाठी अधिवेशन घेण्यात येत आहे, असे जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्ष आशा ठाकरे यांनी सांगितले. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सीमा ढवळे राहणार आहेत. जिल्हा प्रकल्प अधिकारी माधुरी मडावी यांच्या हस्ते सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे. डॉ. सुलभा गावंडे, दुर्गा येडे, आशा ठाकरे, शारदा देशमुख, प्रश्नचार्य डॉ. विद्या बांगडे, नगिना पुगलिया, पुष्पा बोडे, सुमित्रा म्हात्रे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात ‘बहुजन स्त्रियांचे योगदान काल-आज-उद्या’ आणि ‘महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची दिशा व जिजाऊ ब्रिगेड’ यावर गंगाधर बनबरे व जयश्री शेळके हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी जिल्हय़ात महिलांच्या उत्थानात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांचा सामाजिक सेवा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या अधिवेशनात जिल्हय़ातील सुमारे ३ हजार महिला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम स्थळाला राणी हिराई परिसर, तर विचार मंचाला स्मृतिशेष पंढरीनाथ सोनटक्के विचारपीठ असे नाव देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष लता होरे, कार्याध्यक्ष छाया चटप, जिल्हा सचिव सुरेखा बोबडे, कोषाध्यक्ष मीनाक्षी ढुमणे, संघटक रजनी चटप, रजनी जेरूरकर, अल्का टोंगे, पुष्पा बोडे आदी उपस्थित होत्या. |
No comments:
Post a Comment