मंत्र्यांच्या बंगल्यात महिलांची धडक
Thursday, January 22nd, 2009 AT 12:01 AM
jijau brigade
मुंबई, ता. २१ - मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी "जिजाऊ ब्रिगेड'च्या महिला कार्यकर्त्या आज दुपारी मंत्रालयासमोरील सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शासकीय बंगल्यात घुसल्याने एकच खळबळ उडाली. "ब्रिगेड'च्या २१ महिलांनी बंगल्याच्या एका खोलीत आतून कडी लाऊन स्वतःला कोंडून घेतले व आत्मदहनाचा इशारा दिल्यामुळे पोलिस यंत्रणेची तारांबळ उडाली.
मंत्र्यांना बाहेरून खिडकीतून दरवाजा उघडा म्हणून त्यांना विनवणी करावी लागली. अडीच तासानंतर या महिलांनी दरवाजा उघडला. सायंकाळी या सर्व महिलांना अटक करून आझाद मैदान पोलिस ठाण्यात त्यांची रवानगी करण्यात आली.
मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या महिला शिष्टमंडळाशी चर्चा केली व मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची सकारत्मक भूमिका असल्याचे सांगितले

No comments:
Post a Comment